वासुदेव नेत्रालयाचा भव्य भुमिपूजन सोहळा

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ओम सिध्दगुरू नित्यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने वरणगाव शहरात मंगळवारी २० डिसेंबर रोजी श्रीमद भगवान पंचमुखी हनुमान कवच पाठाचे १ हजार १११ वेळा पठण आणि हवन २५ ब्राम्हणांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यासोबतच वासुदेव नेत्रालयाचे भूमिपूजन सोहळा होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव येथील सुप्रसिद्ध वासुदेव नेत्रालय यांच्या स्वनुतन होणाऱ्या वास्तूचे ‘भूमिपूजन” असून त्यासोबत २५ ब्राह्मण्याच्या उपस्थितीत पंचमुखी हनुमान कवच पाठाचे पठण आणि हवन आहे. या कार्यक्रमानंतर प्रसादाचे वाटप देखील करण्यात येणार आहे. वासुदेव नेत्रालयचे संचालक डॉ. रेणुका पाटील आणि डॉ. नितु पाटील यांचे आईवडील वैशाली पाटील आणि तुकाराम पाटील, साकळी येथील गुरुदेव जितेंद्र नेवे (छोटू बाबा) आणि महावीर ज्वेल्लर्स जळगावचे संचालक निलेश ललवाणी यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न होणार आहे.

वरणगाव आणि पंचक्रोशीमध्ये अश्याप्रकारे पंचमुखी हनुमान कवचचे हवन प्रथमच होत असून सर्व नागरिकांनी दिवसभरात आपल्या सोईनुसार दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्या, असे आवाहन वासुदेव नेत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content