यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी गावाजवळील शाळेजवळून बेकायदेशीर वाळूची ट्रॅक्टरने वाहतूक करतांना गस्तीवर आलेल्या कोतवालाने अडवणूक केली असता ट्रक्टरचालकाने शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सांगवी येथे शासकीय कर्तव्यावर असलेले कोतवाल हिरीष चौधरी रा. भालशिव ता.यावल हे अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी काल सोमवारी ६ वाजता गस्तीवर होते. गावातील ज्योती विद्यामंदीर शाळेजवळून विना नंबरचे ट्रक्टर वाळू घेवून जात असतांना कोतवाल हरीष चौधरी यांनी ट्रक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू ट्रक्टर चालक निलेश चेत्राम कोळी रा. भालशिव हा ट्रक्टर न थांबवता वेगाने निघून गेला. त्याचा पाठलाग तीन किलोमीटरपर्यंत केला. पुढे लोखंडी फावडा हातात घेवून शिवीगाळ व जिवेठार मारण्याची धमकी दिली. कोतवाल हरीष मोहन चौधरी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात ट्रक्टरचालक चैत्राम कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीसl निरिक्षक सुधीर पाटील , पोहेकॉ लक्ष्मण देवरे, पोलीस अमलदार संजय सपकाळे हे करीत आहे .