रावेर प्रतिनिधी । अवैध वाळूच जप्त ट्रक्टर-ट्रॉलीवर कारवाई न करता सेटलमेंट करून सोडल्याप्रकरणी प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी महसूल त्या कर्मचाऱ्यांना सोमवार १५ फेब्रुवारीपर्यंत लेखी खुलासे मागविले आहे.
वाहतूक केल्याप्रकरणी पकडलेले ट्रॅक्टर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दंड न घेता सोडून दिल्याचा प्रकार बुधवारी घडला होता. याबाबत लाईव्ह ट्रेन्डस न्यूज प्रकाशित केलेल्या वृत्ताची दाखल घेत, प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी या कर्मचाऱ्यांकडून सोमवारपर्यंत लेखी खुलासा मागवला. तो समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. बुधवारी सर्कल सचिन पाटील, विठोबा पाटील व तलाठी दादाराव कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून जप्तीच्या नावाखाली कार्यालयात जमा केले होते . मात्र तासाभरातच हे ट्रॅक्टर कोणताही दंड न घेता सोडून दिल्याचा प्रकार घडला होता. कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती देण्याचे टाळून कर्तव्यास तिलांजली दिली आहे व वाळू नसून माती असल्याचे सांगत सावरासावर करत आहे.