रावेर- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरचा चित्तथरारक पाठलाग करून तहसीलदार बंडू कापसे यांनी मध्यरात्री पकडले आहे.
अवैध वाळूने भरलेले ट्रक्टर-ट्रॉली रात्रीच्या सुमारास वाहतूक करीत असल्याची गुप्त माहीती तहसीलदार बंडू कापसे यांना मिळाली. त्यावर रात्री बाराच्या सुमारास स्टेशन रोडने सिनेस्टाईल पाठलाग करून सदर वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले आहे. या दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणा-या वाळू व्यावसायीकाने महसूल पथका समोर दोन वेळा मोटरसायकल आडवी टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु याला महसूल पथक न जुमानता वाहतुक करणारे ट्रक्टर ट्रॉली जप्त करण्यात केले आहे. सदर कार्यवाही तहसीलदार बंडू कापसे, मंडळ अधिकारी यासीन तडवी, शेलकर, तलाठी गुणवंत बारेला आदी महसूल पथकाने केली आहे.