


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील वाल्मिक नगर भागात घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या संशयिताला शुक्रवार, १६ सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
त्याच्याकडील गॅस भरण्याची मोटार तसेच सिलेंडर , तसेच इलेक्ट्रीक काटा असे १५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाल्मिक नगर परिसरातील एका घरासमोर ताडपत्रीच्या छताखाली शुभम राजू बोरसे वय २५ हा तरुण घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाला. त्यानुसार शुक्रवारी शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याठिकाणी ४५ हजार रुपयांची इलेक्ट्रीक मोटार, २ हजार रुपयांचा इलेक्ट्रीक काटा व सिलेंडर असा एकूण १५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच संशयित शुभम बोरसे यास अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल कांबळे याच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.


