मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारने वारीला परवानगी द्यावी या मागणीसाठी संत नामदेव संस्थानने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लक्षावधी वारकरी जात असतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे वारी रद्द करण्यात आली होती. तर यंदा देखील फक्त १० दिंड्यांना बसने वारी करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पण पायी वारी नाकारण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी दिली जावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. कोरोना संकटामुळे पायी वारी काढण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारलेली आहे.
या पार्श्वभूमिवर, राज्यातील २५० पालख्यांना पायी वारी काढण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात संत नामदेव संस्थानच्या नरसी नामदेव यांनी याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणीत नेमके काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.