वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे खासदार रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी (व्हिडिओ )

रावेर, प्रतिनिधी : बुधवारी झालेल्या वादळी पावसामुळे रावेर तालुक्यातील २७ गावांना याचा फटका बसला असून यात ८७७ शेतक-यांचे ४५० हेक्टर वरील १८ कोटी तीन लाख चाळीस हजाराचे नुकसान झाले आहे. आज नुकसानग्रस्त भागाची खासदार रक्षाताई खडसे यांनी पाहणी केली.

बुधवारी झालेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तूटल्या होत्या पशुधनचे नुकसान झाले होते. अनेक डेरेदार वृक्ष उन्मळुन पडले होते. काही घरांचे किरकोळ नुकसान झाले होते. रावेर तालुक्यात बुधवारी झालेल्या पावसामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अटवाडे, बोरखेडा, तामसवाडी, भोकरी, मोरगाव खु, दोन्ही के-हाळे,वाघोड, कर्जोत, वड़गाव, दोन्ही विवरे, भाटखेडा, रावेर, होळ, भोर, ऐनपुर, निंबोल, धुरखेडा, बोहर्ड, पातोंडी, पुनखेड़ा, कुंभारखेडा, चिनावल, चुनवाडे, निंभोरा या गावांचा केळी नुकसानमध्ये समावेश आहे.काल आमदार शिरीष चौधरी यांनी या परिसरात पाहणी केली होती. आज खासदार रक्षाताई खडसे  यांनी पाहणी केली. दरम्यान, या नुकसानीबाबत तहसीलदार उषारानी देवगुणे यांनी माहिती दिली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/732211777527870/

 

Protected Content