वाणेगाव येथे ग्राम समितीच्या बैठकीत कोरोनाबाबत जनजागृती

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील वाणेगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राम समितीची बैठक घेण्यात आली. यात कोरोनाची जनजागृती बाबत चर्चा करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाणेगाव ता. पाचोरा येथे कोरोना ग्राम समितीची बैठक घेण्यात आली. शासनाने दिलेल्या आदेशानुसार २८ एप्रिल ते २ मे पर्यंत सगळ्यांनी रॅपिड टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. खेडेगावांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असून सर्वांनी शासनाने दिलेल्या सर्व नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. गावात गल्लोगल्ली जावून सकाळी ११ वाजे नंतर दुकाने बंद करणे, मास्क, सँनिटायझर चा वापर, वारंवार हात धूणे, सामाजिक अंतर ठेवावे. अशा सुचना करून जनजागृती करण्यात आली. यावेळी सरपंच पुत्र भुषण पाटील, अजय संसारे, ग्रामसेवक नंदकिशोर पाटील, पोलीस पाटील, नितीन जमदाडे, मनोज पाटील, अप्सर तडवी उपस्थित होते.

Protected Content