वाढत्या महागाईच्या विरोधात अमळनेरात काँग्रेसचे निदर्शने

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाढत्या महागाई कमी करावी आणि अग्निपथ योजना रद्द करावी या मागण्यांसह इतर विविध मागण्यांसाठी अमळनेर ग्रामीण काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमो निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

 

निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे देशांमध्ये दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल, गॅसच्या वाढत्या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंवर लावलेल्या जीएसटीमुळे सर्वसामान्य माणसाला जीवन जगणे मुश्कील झाले आहे. तसेच घाईघाईत चालू केलेल्या भारतीय सैन्यदलातील अग्निपथ योजनेमुळे युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या सर्व विषयासंदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विरोध नोंदवित आहे. दरम्यान या निर्णयावर बदल करावेत. निर्णयात बदल न झाल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर अमळनेर ग्रामीण काँग्रेस कमिटीचे महिला जिल्हाध्यक्ष सलोचना वाघ, तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, मुन्ना शर्मा, शालीग्राम पाटील, डॉ. रवींद्र पाटील, भानुदास कांबळे, पी.वाय. पाटील, रज्जाक शेख, महेश पाटील, कुणाल चौधरी, विवेक पाटील, प्रवीण पाटील, संदीप पाटील, प्रवीण जैन, कैलास पाटील, लोटन पाटील, धनराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

Protected Content