वाझे यांना बेकायदा अटक; भावाची उच्च न्यायालयात याचिका

 

मुंबई : वृत्तसंस्था । सचिन वाझे यांचे भाऊ सुधर्म यांनी उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) वाझे यांना बेकायदा  अटक केली आहे.  त्यांना उच्च न्यायालयात हजर करून ही अटक कायद्यानुसार होती हे स्पष्ट करण्यास सांगावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून काही प्रभावी राजकीय नेत्यांनी वाझे यांना लक्ष्य केले आहे. ते वाझे यांना बळीचा बकरा बनवत आहेत, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकं प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली  एनआयएकडून पुरावे गोळा  केले  जात आहे. एनआयएकडून वाझे यांच्या घराच्या परिसरासह इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर वाझे यांच्या टीममधील अधिकाऱ्यांनी नेल्याचं समोर आलं आहे.

 वाझे यांच्या अटकेनंतर गुन्हेगारी गुप्तवार्ता युनिटकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए वाझे यांच्या घराजवळील आणि इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही व डीव्हीआरच्या शोधात होती.

 गुन्हेगारी गुप्तवार्ता टीमने वाझे राहत असलेल्या मुंबई-आग्रा रोडवरील साकेत को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसाटीला भेट दिली होती. यावेळी टीम सीसीटीव्ही आणि डीव्हीआर घेऊन होती, अशी माहिती समोर आली आहे. जी इनोव्हा गाडी स्कॉर्पिओसोबत आढळून आली होती, तिचे शेवटचं लोकेशन ठाण्यातील माजीवाडा जंक्शन येथे आढळून आलं होतं. हे ठिकाण वाझे यांच्या घरापासून ३ किमी अंतरावर आहे.

मनसुख यांचे ठाण्यातील निवासस्थान, दुकान आणि भोवतीच्या आस्थापनांमधील सीसीटीव्ही व ‘डीव्हीआर’चा(सीसीटीव्ही चित्रण साठवून ठेवणारे यंत्र) शोध एनआयए घेत आहे. तपासाचं कारण देत गुन्हे शाखेचे पथक हे यंत्र घेऊन गेल्याची माहिती एनआयएला मिळाली. असाच प्रकार वाहनांच्या नोंदणी क्रमांक तयार करणाऱ्या अन्य दुकानातही घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. .

Protected Content