तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील वाघ नगरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी ५ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, करण संजय शिंदे (वय-१८) रा. वाघ नगर, जळगाव हा आईवडील व भावासोबत वास्तव्याला आहे. वडील संजय आनंद शिंदे यांचे श्रीधर नगरात लॉन्ड्रीचे दुकान आहे. मंगळवार १४ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, बाजूच्या खोलीत झोपलेला लहान भाऊ नितीन याच्या लक्षात येताच त्याने तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहेत. मयताच्या पश्चात आई शारदा, नितीन आणि वडील संजय आनंदा शिंदे असा परिवार आहे. प्राथमिक तपास स.फौ. सुरेश लोखंडे करीत आहे.

Protected Content