
मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभेत सीएए, एनआरसीला पाठिंबा तर राज्यसभेत विरोध…पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडूक? अशा कडवट शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
देशभरासह महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीने सत्तेत आलेल्या शिवसेनेने सीएएला आता आपला पाठींबा दर्शवला आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर घेतल्यानंतर सुधारित नागरिकता कायद्याला घाबरायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. याच वक्तव्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर लोकसभेत सीएए, एनआरसीला पाठिंबा तर राज्यसभेत विरोध…पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडूक? अशा कडवट शब्दात टीका केली आहे.