जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील वाघारी येथील बंद घर फोडून घरातील लाकडी कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ७८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी ४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनराज अर्जून उंबरकर (वय-३८) रा. वाघारी ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी ४ मार्च रोजी सकाळी १० वाजता ते घर बंद करून कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बंद घर पाहून घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील लाकडी कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ७८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दुपारी १ वाजता उंबरकर हे घरी आले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसून आले. तसेच लाकडी कपाटातील सामान अस्तव्यस्त करण्यात आलेला होता. त्यांनी लागलीत तातडीने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रियाज शेख करीत आहे.