चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वाकडी येथे शेतकऱ्याची घरसमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
अधिक माहिती अशी की, अशोक बारकु पाटील (वय-५२) रा. वाकडी ता.चाळीसगाव हे शेतकरी आहे. त्यांच्याकडे शेतीच्या कामासाठी दुचाकी (एमएच १९ बीझेड ४८५९) आहे. १९ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता कामावरून येवून दुचाकी घराच्या पोर्च मध्ये पार्किंग करून लावली. दरम्यान २० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर दिसून आली नाही. गावात शोध घेतला असता दुचाकी मिळून न आल्याने पोलीसात धाव घेतली. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिलीप रोकडे करीत आहे.