वाकडी येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

3suicide 163

 

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाकड येथील 32 वर्षीय तरुणाने मंदिराच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आलीय. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडालेली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा बाजीराव गायकवाड (वय 32 रा. वाकडी ता. जि. जळगाव) हे हात मजुरीचे काम करत होते. मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. आनंदा गायकवाड हे गुरुवारी रात्री उशिरा कामावरून घरी न जाता ते गावातील मांगीलाल महाराज मंदिरात जाऊन झोपले. मात्र, त्यांनी मंदिरातील भगवा ध्वजाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मोठा हंबरडा फोडला. आनंदा गायकवाड यांना तातडीने खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन महाजन यांनी त्यांना मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महाजन यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत आनंदा गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

Add Comment

Protected Content