वसंतवाडीसह रामेश्वर कॉलनीत कुटुंबांमध्ये हाणामारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील वसंतवाडी तसेच रामेश्वर कॉलनी येथे दोन वेगवेगळ्या दिवशी दोन कुटुंबांमध्ये हाणमारी झाल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांप्रकरणी शनिवार, ६ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसात परस्पर तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्ह्याची नोदं करण्यात आली आहे.

 

पहिली घटना ५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे घडली. मागील भांडणाच्या कारणावरुन कल्पना मोरे, किरण मोरे, या दोघांसह एकाने खातूनबी शेख अजीज वय ४० यांना वसंतवाडी येथे शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. अशा खातूनबी यांच्या तक्रारीवरुन शनिवारी कल्पना मोरे, किरण मोरे, रा. दत्तनगर मेहरुण जळगाव व आणखी एक जण अशा तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण हे करीत आहेत.

 

तर दुसरी घटना ६ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे घडली.  याठिकाणी रहिवासी कल्पना शामराव मोरे यांना शकील पिंजारी रा. मेहरुण, खातूनबी या दोन जणांनी मागील भांडणाच्या कारणावरुन धक्काबुक्की करत मारहाण केली. तेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. अशा कल्पना मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शकील पिंजारी व खातूनबी या दोन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.

Protected Content