वलठान येथे पैशाच्या वादातून महिलेस मारहाण

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । शेतात निंदायला गेलेल्या ४० वर्षीय महिलेला पैशाच्या वादातून मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील वलठान येथे घडली असून   ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

हिरामण राठोड (रा. वलठान ता. चाळीसगाव) हे वलठणला  परिवारासह वास्तव्यास असून शेती करून उदरनिर्वाह

करतात. २५ जूलैरोजी त्यांच्या पत्नी कृष्णाबाई राठोड (वय-४०)  चंडीकावाडी शिवारातील शेतात निंदण्यासाठी सकाळी   गेल्या. त्यावेळी हिरा राठोड, रामेश्वर राठोड, योगेश राठोड, मोरसिंग राठोड, भाईदास राठोड, रमेश राठोड, ज्ञानेश्वर राठोड व कांतीलाल राठोड हे सर्वजण शेतात येऊन हिरामण राठोड यांना १,५०,००० रुपये देऊन हि जमीन विकत घेतली आहे. त्यामुळे इथे निंदण्यासाठी यायचे नाही असे कृष्णाबाई यांना सांगितले. त्यावर तुमचे दिड लाख उसनवारीने घेतले आहे. ते पैसे लवकरच आम्ही व्याजासह तुम्हाला परत करू असे सांगत असताना हिरा राठोड यांनी हातातील खुरपे हिसकावून डोक्यात मारले. कृष्णाबाई खाली बसताच रामेश्वर राठोड व मोरसिंग राठोड यांनी काठीने कमरेवर व पाठीवर मारहाण केली. योगेश राठोड, भाईदास राठोड व रमेश राठोड यांनी चापट बुक्यांनी मारहाण केली. निंदण्यासाठी सोबत आलेल्या शारदा राठोड सोडवायला गेल्या असता ज्ञानेश्वर राठोड व कांतीलाल राठोड यांनी त्यांनाही चापट बुक्यांनी मारहाण केली. हे सगळे दृश्य मुलगा सजन राठोड हा मोबाईलने चित्रफित करत असताना रामेश्वर राठोड यांनी काठीने मारून मोबाईलचे नुकसान केले. कृष्णाबाई राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास किशोर सोनवणे करीत आहेत.

 

Protected Content