वर्डी येथे ग्रा.पं. कर्मचारी व आशा वर्कर यांना मास्कचे वाटप

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वर्डी येथे चोपडा तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातर्फे बारामती अॅग्रो मार्फत पुरविण्यात आलेले सॅनेटायझेर व मास्क ग्रा.पं. सदस्य, कर्मचारी, अरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर यांना वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,  डाॅक्टर सेलचे अध्यक्ष डाॅ. कांतीलाल पाटील यांच्या सहकार्याने सॅनेटायझेर व मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी माजी जि.प.सदस्य बाळासाहेब पाटील, नंदलाल पाटील, सरपंच मिनाक्षी बेलदार, उपसरपंच विलास पाटील, सचिन डाभे लहुष नायदे, ग्रामविकास अधिकारी बी. पी. यहिदे, विश्वास शिंदे सह कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content