Home Uncategorized वर्कशॉपमधून दीड लाखाच्या सामानांची चोरी; चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा

वर्कशॉपमधून दीड लाखाच्या सामानांची चोरी; चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा


चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव रोडवर असलेल्या एका वर्कशॉप मधून वेल्डिंग मशिन, लोखंडी सामान असा एकुण १ लाख ४४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांवर गुन्हा दाखल केला आहे. 

विलास साहेबराव देशमुख (वय-६०) रा. बसस्थानक शांतीबाग कॉलनी नांदगाव ता. जि.नाशिक यांचे चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव ते रोहिणी दरम्यान हॉटेल निसर्ग जवळ शिवशक्ती वर्कशॉप आहे. याठिकाणी वेल्डिंगची कामे केली जातात. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान अज्ञातचोरट्यांनी त्यांच्या वर्कशॉपमधून ४० हजाराचे वेल्डिंग मशीन, २२ हजाराचे लोखंडी अँगल, ५० हजाराचे ट्रक्टर ट्रॉलीचे टायर, २० हजाराचे ड्रील, ग्राईंडर आणि कटर यासह इतर सामान असा एकुण १ लाख ४४ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नितीन आमोदकर करीत आहे. 

 


Protected Content

Play sound