भुसावळ प्रतिनिधी । तालुका काँग्रेस समितीची बैठक वरणगावात पार पडली असून यात आगामी नगरपालिका निवडणुकीबाबत मंथन करण्यात आले.
भुसावळ तालुका काँग्रेस समितीची बैठक वरणगावात झाली. यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीपभैय्या पाटील यांनी वरणगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षवाढीसाठी व पक्षाच्या ध्येय धोरणांबाबत चर्चा केली. विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीचे पॅनल उभे करण्यावर भर आहे. यासाठी दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांसोबत लवकरच चर्चा करणार असल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डी.जी.पाटील, उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्रसिंग पाटील, चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा समन्वय जलील भाई, मागासवर्गीय सेलचे विवेक नरवाडे, भुसावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकज पाटील, भुसावळ तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, जितू राणे, रवी पाटील, शरद देशमुख, राजू पालीमकर, जयंत सूरपाटणे, सुदर्शन जाधव आदी उपस्थित होते.