Home Cities भुसावळ वरणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलन (व्हिडीओ)

वरणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलन (व्हिडीओ)


वरणगाव दत्तात्रय गुरव । नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये महापुराने थैमान घातले होते. त्यामुळे वित्तहानी व जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी वरणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बुधवार २८ जुलै रोजी  निधी संकलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शहरात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलन करण्यात येत आहे. शहरातील व्यापारी वर्गाकडून हा निधी जमा केला जात आहे. यथाशक्ति हा निधी व्यापाऱ्याकडून घेतला जात असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फंडांमध्ये जमा केला जाणार आहे, अशी माहिती राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे. 

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4221481584597730

 


Protected Content

Play sound