यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या चौकीतील अज्ञात लोकांनी वन विभागातील अधिकाऱ्यांच्या मध्यरात्रीच्या सुमारास सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन मोटर सायकल जाळल्याची घटना घडली असून यावल पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास सातपुडा वन विभागाच्या पश्चिम क्षेत्र वाघझीरा क्षेत्रात सातपुडा पायथ्याशी असलेल्या वन चौकीत सेवेत कार्यरत असलेल्या वन अधिकारी यांच्या एम एच ही बुलेट कंपनीची दूचाकी आणि एम एच या स्पॅलेडंर कंपनीची मोटर सायकल अंदाजी किमत १ लाख२० हजार या वाघझिरा वन चौकीत उभ्या असलेल्या दोघ मोटर वाहन अज्ञातांनी जाळल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे वनक्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली असून या घटनेची फिर्याद निंबादेवी उतर वन क्षेत्र पश्चिम विभाग यावलचे वनसंरक्षक संदीप तात्या पंडीत यांनी दिली असून यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम यावल पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. दरम्यान दि. १७ मे रोजी याच वाघझीरा वन चौकीच्या क्षेत्रात विनापरवाना सागवान वृक्षांची कत्तल करून लाकडाची वाहतुक करणारे संशयीत आरोपी ईश्वर बारेला, तकडू चैनसिंग पावरा , शरीफ अकबर तडवी , शाकीर कुरबान तडवी , चंदन फुलसिंग पावरा आणी गजा हरमित पावरा यांच्याविरुद्ध या आदीच राकेश |निकुंभे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मोटरसायकल जळीत प्रकरणातील घटनेत ही याच लोकांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.