वन्यजीव संघर्ष जनजागृती कार्यशाळेत प्राणी हल्ल्याबाबत मार्गदर्शन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्रातील आदीवासी बांधवांसाठी वनविभागाच्या वतीने प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत वन्यजीव संघर्ष बाबत जनजागृती कार्यक्रम आज पार पडला.

 

सातपुडा पर्वतातील यावल तालुक्यातील रूईखेडा आणी रावेर तालुक्यातील अंधारमळी या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातुन वन्यजीव संघर्ष संदर्भातील मार्गदर्शनपर जनजागृती कार्यक्रम पार पडला. यात यावल जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख , सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, वन्यजीव संघर्ष जनजागृती कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व व्हाईल्ड लॉन्डस कंझर्वेशन फाउंडेशन नागपुर चे अजिंक्य भांबूरकर ,नागपुर चे व्हॉलेन्टीअर विजु गजमिये , यावल पुर्व वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी उपस्थित अतिदुर्गम वनक्षेत्रातील गावात राहणार्‍या आदिवासी बांधवांना वन्यप्राणी यांच्या हल्ल्याच्या घटना व नागरीकांनी घ्याव्याची दक्षता या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.  याप्रसंगी वनकर्मचारी यांना वन्य प्राणी हाताळणे , प्राण्यांचे संरक्षण व देखभाल करणे, नैसर्गीक अधिवासात सोडणे या बाबतचे प्रात्यक्षिक दाखवुन मार्गदर्शन करण्यात आले.

 

या जनजागृतीपर आयोजीत कार्यशाळेत अंधारमळीचे पोलीस पाटील रमजान तडवी , वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष , पदाधिकारी , ग्राम पंचायतचे सदस्य व प्राथमिक माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा मोह मांडलीचे प्रा . कुमावत सर व त्यांचे सर्व सहकारी तसेच वनपाल अतुल तायडे , रविन्द्र तायडे, रज्जाक तडवी, वनरक्षक गोवर्धन डोंगरे , कृष्णा शेळके , गणेश चौधरी , तुकाराम लवटे, प्रकाश बारेला, जिवन नागरगोजे, नंदलाल वंजारी यांनी ही वन्यप्राणी सघर्ष जनजागृती कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी आपला सहभाग नोंदविला.

Protected Content