यवतमाळ । गेल्या अनेक दिवसांपासून जगासमोर न आलेले वन मंत्री संजय राठोड हे आज पोहरादेवी देवस्थानावर दर्शनासाठी जाणार असून त्यांचे समर्थक जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड पोहरादेवी मंदिरात येणार आहेत. सकाळी साधारण साडे अकरा वाजताच्या सुमारास संजय राठोड पोहरादेवीला येतील, अशी माहिती आहे. राठोड हे सकाळी पोहरादेवीकडे जाण्यास निघतील. सकाळी 11.30 वाजता ते पोहरागड येथे पोहचतील.
या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांचे समर्थक जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.