वधू-वर परिचय मेळावे काळाची गरज – शालिग्राम मालकर

 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सध्यस्थीतीत प्रत्येक व्यक्ती समाज हा इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आला3 असला तरी संपर्क हा दूर गेला आहे. समाजातील अनिष्ट चालिरिती, रूढी, परंपरा यांच्या मागे न धावता विवाह संस्था टिकविण्यासाठी वधू-वर परिचय मेळावे घेणे ही काळाची गरज आहे, असे मत माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी केले.

जळगाव येथे 25 डिसेंबर रोजी माळी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा संपन्न होणार आहे. त्याप्रसंगी आज ता.17 रोजी अमळनेर येथे माळी समाज पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

यावेळी माळी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. नलिन महाजन, विभागीय उपाध्यक्ष भास्कर माळी, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्यामराव माळी सर, जिल्हा चिटणीस दगडू माळी, युवक जिल्हाध्यक्ष भीमराव महाजन,गांधली येथील प्रा. नितीन चव्हाण,आंबापिंप्री येथील रमेश माळी सर, कळमसरे येथील मुरलीधर चौधरी, प्रा. हिरालाल पाटील, नथु चौधरी, गजानन पाटील, पिंपळीचे रविंद्र महाजन आदी समाजबांधव यावेळी उपस्थित होते.

कोरोना मुळे वधू-वर परिचय मेळावे झाले नव्हते मात्र उपवर वधू-वर पालकांना आपल्या मुलांना, मुलींना योग्य स्थळ सुचवीण्यासाठी परिचय मेळावा हा महत्वाचा असून राज्यासह खानदेशातील समाजबांधव यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असेही आवाहन जिल्हाध्यक्ष श्यामराव माळी यांनी केले. डॉ. नलिन महाजन, प्रा. नितीन चव्हाण, यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील तर आभार भीमराव महाजन यांनी मानले.

 

 

Protected Content