पाचोऱ्यात आठ दिवस शर्थीचे प्रयत्न करून महिलेचे वाचविले प्राण

 

पाचोरा, प्रतिनिधी । डॉक्टरांना नेहमीच देव मानले जाते याचेच उत्तम उदाहरण पाचोरा शहरातील सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी या ॅस्पिटलच्या डॉक्टर कडुन बघावयास मिळाले आहे. एका गंभीर जखमी महिलेस जिवनदान देण्याचे येथील डॉ. स्वप्निल पाटील पाटील यांनी करुन दाखवत “देव तारी त्यास कोण मारी” ही उपमा सार्थ करत आपल्या अनुभवाच्या जोरावर जखमी महिलेस जिवनदान देण्याचे काम करत आरोग्य क्षेत्रात एक उत्तम उदाहरण ठेवले आहे.

जामनेर तालुक्यातील सुनंदाबाई बाविस्कर यांचा गेल्या ८ दिवसांपूर्वी मोटरसायकल अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवुन मेंदुत रक्तश्राव झाल्याने त्या अत्यवस्थ होत्या. अशा परीस्थितीत त्यांना पाचोऱ्यातील सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च करण्याचीही त्यांची परिस्थिती नसतांना डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांनी कुटुंबियांना धीर देत पुढील उपचार सुरू केले. मेंदुत रक्तश्राव झाल्याने सुनंदाबाई बाविस्कर ह्या कोमात गेल्या होत्या. परंतु आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाचा परिपुर्ण फायदा घेत डॉ. स्वप्निल पाटील यांनी सतत ७ दिवस स्वत: लक्ष देवुन उपचार करत महिलेस जिवनदान दिले. दि. ९ जानेवारी रोजी सुनंदाबाई बाविस्कर यांना हाॅस्पिटल मधुन डिस्चार्ज देण्यात आला. याप्रसंगी रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी डॉ. स्वप्निल पाटील यांचे चरण स्पर्श करुन आभार मानले. यावेळी लहुजी संघर्ष सेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव नाना भालेराव, जिल्हाध्यक्ष सुखदेव आव्हाड, उत्तर महाराष्ट्र संघटक प्रकाश कोतकर, जिल्हा सल्लागार राजेंद्र चव्हाण, समाजसेवक सुरज चांगरे, तालुका सचिव गोपाल अहिरे, समाजसेवक दिप जोंधळे (दोंडवाडे), जितेंद्र बाविस्कर (सोनाळ), ईश्र्वर बाविस्कर (सोनाळा), संभाजी बाविस्कर (सोनाळा), नंदु इंगळे (सोनाळा) यांनी डॉ. स्वप्निल पाटील यांचे आभार मानले. यावेळी सर्वच उपस्थितांना आनंद अश्रु अनावर झाले होते.

Protected Content