यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी– यावल तालुक्यातील वड्री येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअमरनपदी उमाकांत प्रभाकर पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश सोना सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . यावल तालुक्यातील वड्री विविध कार्यकारी सहकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक भाजपा पुरस्कृत जिल्हा परिषदच्या मावळत्या सदस्या सविता भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातुन बिनविरोध निवड करण्यात आली.
वड्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात जिल्हा परिषदच्या मावळत्या सदस्या सविता भालेराव यांच्या उपस्थितीत विकासो चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी झालेल्या सभेत चेअरमनपदी उमाकांत प्रभाकर पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश सोना सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालक लिलाधर चौधरी, व्ही.पी.चौधरी, प्रमोद चौधरी, पकंज चौधरी, सचिन चौधरी, फत्तु तडवी, लुकमान तडवी, मुबारक तडवी, भागवत भालेराव, रेखा पाटील, छाया पाटील यांच्यासह सरपंच अजय भालेराव, अतुल भालेराव आदी उपस्थित होते.
निवडणुक निर्णय आधिकारी म्हणुन संदीप शिंदे यांनी काम पहिले. संस्थेचे सचिव सुनिल सुरवाडे व शिपाई शब्बीर तडवी यांनी सहकार्य केले . यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्यासह संचालकांचा सविता भालेराव यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला. आभार सचिव सुनिल सुरवाडे यांनी मानले .