वड्री ते मोहराळा रस्त्यास मंजुरी ; ग्रामस्थ कामाच्या प्रतीक्षेत

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील वड्री ते मोहराळा हा पाच किलोमिटरचा रस्त्यास कै. हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांतून मंजुरी मिळालेली असून   लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी लगत असलेल्या हरिपुरा, मोहराळा, वड्री, परसाडे आदी गावांना जोडणारा हा वड्री ते मोहराळा या पाच किलोमीटर रस्ता आहे. या रसत्याचे डांबरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासुन रखडले आहे. परिसरातील शेतकरी बांधवांच्या शेती कामासांठी जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे.  काही दिवसापुर्वी या रस्त्यावर माजी आमदार कै. हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातुन व स्थानिक निधीतुन या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास मंजुरी मिळुन रस्त्यावर खडी देखील टाकण्यात आली होती.  मात्र निवडणुकीनंतर या ठिकाणी कामासाठी टाकलेली खडी रातोरात ठेकेदारांने उचलुन नेल्याची माहीती मिळाली आहे. संबधीत ठेकेदाराने हा रस्ता कागदोपत्री तर पुर्ण केला नाही ना ? असा प्रश्न देखील परिसरातील शेतकऱ्यांकडुन व्यक्त उपस्थित करण्यात येत आहे. तरी वरिष्ठ पातळीवर या डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या रस्त्याचा गोंधळलेला प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शेतकरी बांधवांकडुन करण्यात येत आहे.

 

 

Protected Content