वडेट्टीवार बोलून फसले ! अनलॉकची घोषणा केल्यानंतर संभ्रम; जनसंपर्क खात्याची नवी प्रेस नोट !

मुंबई वृत्तसंस्था । राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जळगावसह राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्याची घोषणा केली असली तरी राज्याच्या माहिती व जनसंपर्क खात्याने मात्र याबाबत अद्याप काहीही माहिती नसल्याचे सांगितल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सरकारमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे राज्यातील व विशेष करून या जिल्ह्यांमधील जनतेने सुटकेचा निश्‍वास सोडला. यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश असल्याने जळगावातही अनलॉक होणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र राज्याच्या जनसंपर्क खात्याने आपल्याला याबाबत काहीही माहिती नसून अनलॉकचा विचार सुरू असल्याची प्रेस नोट जारी केली आहे. यामुळे राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे.

 

माहिती व जनसंपर्क खात्याने जारी केलेली प्रेस नोट  पुढीलप्रमाणे आहे.

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत

नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन 

 ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे,या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन  पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात  या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.

 

Protected Content