Home Cities जळगाव शिक्षण अधिकाऱ्यांना बांगड्या अन् साळी चोळीचा आहेर (व्हिडिओ)

शिक्षण अधिकाऱ्यांना बांगड्या अन् साळी चोळीचा आहेर (व्हिडिओ)

0
75


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील मांडळ माध्यमिक शाळेत आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी वारंवार निवेदन देवूनही कार्यवाही करण्यात न आल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे माध्यमिक शिक्षक अधिकारी डॉ. नितीन बच्छाव  यांना बांगड्या अन साळी चोळीचा आहेर देवून निषेध व्यक्त करण्यात आला.

 

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील माध्यमिक शाळेत शिक्षण सेवक योगेश धोंडू साळुंखे, मुख्याध्यापक यांचेसह संस्थाचालक यांनी शासनाची दिशाभूल करीत आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी न्याय चौकशी करण्यात यावी मागणीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, प्रशासनाला २८ फेब्रुवारी रोजी पत्र देण्यात आले होते. यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांना निवेदन देण्यात आले. चौकशी समिती नेमून संबधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे डॉ. नितीन बच्छाव यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, उपाध्यक्ष दिगंबर सोनवणे, जितेंद्र केदार, वैभव शिरतुरे, ललित घोगले, राहुल सुरवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/964951940889958

 


Protected Content

Play sound