लोखंडी सुरा घेवून फिरणाऱ्या संशयितावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंचमुखी हनुमान मंदीर परिसरात हातात लोखंडी कोयता घेवून दहशत माजविणाऱ्या एका संशयित आरोपीवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी बुधवारी २६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लोखंडी सुरा हस्तगत करण्यात आला आहे.

प्रमोद शामराव सोनवणे (वय-४३) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर परिसरात प्रमोद सोनवणे हा हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजवित असल्याचे गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे शोध पथकाने बुधवारी २६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी प्रमोद शामराव सोनवणे यांच्यावर कारवाई करत ताब्यात घेतले. त्याच्याकडून १७ इंच लांबीचा लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कान्स्टेबल चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रमोद सोनवणे याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर करीत आहे.

Protected Content