फैजपूर, प्रतिनिधी । तपत कठोरा येथील कांतीलाल सुभाष पाटील हे नुकतेच लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण झाले असून याबद्दल त्यांचा सत्कार फैजपूर येथील विविध संस्थांच्या वतीने मसाका संचालक नरेंद्र नारखेडे व सहकारी यांनी त्याचे निवासस्थानी जाऊन केला.यावेळी त्यांचे वडील सुभाष पाटील व आई यांचेही सत्कार करण्यात आला
कांतीलाल पाटील यांनी कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता स्वतः च्या मेहनतीवर हे यश मिळविले असून ग्रामीण भागात राहून यश संपादन केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.लवकरच ते मसुरी येथे प्रशिक्षण करिता निघणार आहे. याप्रसंगी सातपुडा पतसंस्था संचालक डॉ. पद्माकर पाटील, श्री लक्ष्मी पतसंस्था संचालक अनिल नारखेडे,डॉ.गिरिष लोखंडे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे , मयूर नारखेडे उपस्थित होते. माझी प्रशासकीय सेवा कायम देशहितासाठी व समाज उन्नती करीता राहील अशी ग्वाही कांतीलाल पाटील यांनी उपस्थितांशी बोलताना दिली.