Home धर्म-समाज लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


सावदा प्रतिनिधी । ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार व विधानसभेचे माजी अध्यक्ष लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या ९२ व्या जयंती निमित्त खिरोदा येथे त्यांना त्यांच्या स्मृतीस्थळावर श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळाच्या आवारात लोकसेवक मधुकरराव चौधरी यांचे स्मृतीस्थळ आहे. त्याप्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी, अरुणा चौधरी, जि.प.सदस्य सुरेखा पाटील, गुणवंत टोंगळे, धनंजय चौधरी, यज्ञा पाटील, प्रभात चौधरी, अजित पाटील, कुमार चौधरी, तुकाराम बोरोले, प्रतिभा बोरोले, प्रा.एन.आर.फेगडे, जी.पी.पाटील, बी.एस.तायडे, के.आर. महाजन, एस.टी.भुकन, डी.एड, बी.एड स्टाफ कर्मचारी, सुधीर यादवराव चौधरी, उल्हास दयाराम चौधरी, रोहिणीताई चौधरी, संजय काशिनाथ चौधरी, भानू मेढे आदी प्रमख कार्यकर्ते व संस्था परिवारातील मंडळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound