जळगाव, प्रतिनिधी । विविध राज्यातील स्थिर शासन अस्थिर करणाऱ्या,लोकशाही विरोधी भाजपा सरकार अथवा मोदी सरकार ज्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार आहेत ते अस्थिर स्वरूपात करून येनकेन प्रकारे ती सरकारे पाडण्याचा डाव सुरू केला आहे.हा प्रकार लोकशाही विरोधी भाजपा सरकारचा असून याचा जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जाहीर निषेध निवेदन देऊन करण्यात आला.
आज सोमवार दि २७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना भाजपा सत्तेचा गैरवापर करुन लोकनियुक्त सरकार पाडणे हुकुमशाही मोदी सरकारने थांबवावे, राजस्थानचे विधानसभा अधिवेशन तातडीने बोलवावे असे आशयाचे निषेधाचे निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, हुकुमशाही मोदी सरकारने कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश यांसारख्या राज्यांमधील लोकनियुक्त कॉंग्रेस सरकारे पैसा व बळाच्या जोरावर पाडली आहेत. त्याठिकाणी भाजपा विचारांचे किंबहुना भाजपाचे सरकार त्या ठिकाणी स्थापन करून हा प्रकार घटना विरोधी आहे. लोकशाहीचे हुकुमशाहीत परिवर्तन करून लोकशाहीचे गळचेपी करीत आहेत. राजस्थानमध्येही आमदारांची पळवापळवी सुरू आहे. याकरिता राजस्थान विधानसभा अधिवेशन तातडीने बोलवावे.फ्लोअर टेस्ट लवकर करावी. दिवसाढवळ्या सुरु असलेल्या या लोकशाहीच्या हत्येविरोधात आवाज उठवणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.याच अनुषंगाने आज दि 27 रोजी सकाळी 10 वाजता “स्पीक अप फॉर इंडिया कॅंम्पेन” या देशव्यापी ऑनलाईन म्हणजेच देशातील लोकशाही वाचवण्यासाठी बोलणार आहोत. यामध्ये सत्तेचा गैरवापर करुन लोकनियुक्त सरकार पाडणे हुकुमशाही मोदी सरकारने थांबवावे,राजस्थानचे विधानसभा अधिवेशन तातडीने बोलवावे.अशी मागणी जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. भाजपा सरकार विरोधात निषेधाचे निवेदन देतांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील, अशोक खलाने,शाम तायडे, अजबराव पाटील, जमिल शेख, प्रदीप सोनवणे, बाबा देशमुख, जगदीश गाढे, नदीम काझी, अशोक साळुंखे, वासुदेव महाजन, डॉ. शोएब पटेल, ज्ञानेश्वर कोळी, अमजद पठाण, देवेंद्र मराठे, जाकीर बागवान, मनोज सोनवणे, विजय वाणी, मुजीब पटेल, घोडेस्वार उपस्थित होते.