लोकं ऐकत नाहीय, उद्धव ठाकरेजी आता संचारबंदी लागू करा ; जितेंद्र आव्हाड यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे. लोक ऐकत नाहीत. उद्धव ठाकरेजी आता संचारबंदी हाच एकमेव उपाय असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. लोकांच्या निष्काळजीपणावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.

 

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, परिस्थिती गंभीर आहे. करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८९ झाली आहे. लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. मी स्वतः फिरून हा अनूभव घेतला. लोक ऐकत नाहीत. उद्धव ठाकरेजी संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे. परिस्थितीचा विचार करता…अभी नही तो कभी नही. तर पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी रस्त्यांवरील वाहतुकीचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की. तुमच्या कामाची प्रशंसा होते आहे पण काही जण गंभीर नाहीत. संकट किती भयंकर आहे याची कल्पना काही लोकांना नाही. लॉक डाउन ने भागेल असे वाटत नाही. संचारबंदी लागू अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. तर आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content