यावल प्रतिनिधी । गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्व व्यवसाय पुर्णपणे बंद ठेवण्यात आले असतांना यावल तालुक्यात सुमारे अडीच कोटी रूपयांचा मसाला गुटख्याची बेकायदेशीर विक्री झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे.
सध्या देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने विळखा घातला असुन या पाश्वभुमीवर सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली. या काळात सर्व दुकाने पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. याच काळात यावल तालुक्यातील गुटखामाफीयांकडून गुटख्याची अतिशय बिनधास्तपणे शेजारील राज्य मध्यप्रदेश आणी गुजराज या परप्रांतातुन लाखो रुपयांच्या आयात करून या गुटख्यास शौकीनांसाठी दुप्पट ते तिप्पट अशा चढत्या किमतीत तालुक्यात मोठया प्रमाणावर सर्वत्र विक्री करण्यात येत आहे. या प्रकाराची माहीती अन्न व औषध प्रशासनास नसावी तर ते नवलच म्हणावे लागेल. यावल तालुक्यातील पश्चिम भागातील यावलपासुन अवघ्या १० ते १२ किलोमिटर लांब असलेल्या एका गावात या बेकायद्याशीर संपुर्ण तालुक्यात गुटखा पुरविण्याचा ठेका एका व्यापाऱ्याच्या गोदामावर लाखो रुपयांचा विमल गुटखा साठवुन ठेवण्यात आला. मागणीनुसार तालुक्यातील अनेक गावामध्ये हा गुटखा पाठविण्यात येतो. याची माहिती अन्न व औषध प्रशासनासह इतर अधिकारी वर्गाला देखील माहीती असल्याचे व वरपर्यंत हप्ते देण्यात येत असल्याची एका गुटखा विकणाऱ्या नाव न सांगण्याच्या अटीवरही माहीती दिली. या सर्व कोरोना विषाणूमुळे संचारबंदीच्या गोंधळलेल्या वातावरणात या बेकायद्याशीर विक्री होत असलेल्या गुटखावर प्रतिबंद घालावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.