लॉकडाऊनमध्ये लोकं नियम का मोडताय? या मागे मानसशास्त्रीय कारण आहे का?

 

भुसावळ : लॉकडाऊनमध्ये लोकं नियम का मोडताय? या मागे मानसशास्त्रीय कारण आहे का?. याबद्दल माहिती देताना भुसावळ येथील वेलनेस फाउंडेशनचे निलेश गोरे सांगता की, हे समजण्यासाठी आपल्याला मनोविज्ञानातील एक गोष्ट समजून घ्यायला हवी ज्याला सोल्युशन अ‍ॅव्हर्जन म्हणतात.

 

 

सरळ भाषेत कोणत्याही समाधानाला किंवा पर्यायाला अतार्किक विरोध करण्याची मानसिकता. सोल्युशन अ‍ॅव्हर्जन ही अशी मानसशास्त्रीय बाब आहे ज्यात लोक दिशनिर्देशित केलेल्या सुचनांना, समाधानाला किंवा पर्यायाला विरोध करतात,प्रतिकार करतात किंवा नाकारतात.

 

जेव्हा त्यांना दिलेले समाधान आवडत नाहीत तेव्हा त्याच पालन करण्याला नकार देतात. आशा लोकांना खात्री पटवणे कठीण असते. ते वस्तुस्थिती नाकारतात कारण त्यांना वाटते की वस्तुस्थिती वास्तविक नाही. ते नियम मोडतात आणि जेव्हा त्यांना शिक्षा मिळते तेव्हा ते त्यासही विरोध करतात. त्यांना वाटते की शिक्षा व शिक्षेचा मार्गही अतार्किक आहे.

 

बरेच पत्रकार आणि राजकारणीसुद्धा या मानसशास्त्रीय बाबीने त्रस्त आहेत. सोल्युशन अ‍ॅव्हर्जनने ग्रस्त असलेले लोक इतरांना सहजपणे भडकावू शकतात आणि अनागोंदी करण्यास दवखील कारणीभूत ठरू शकतात.

 

तबालिगी जमात व शाहीनबाग हे याचे सर्वात ताजे उदाहरण आहे

 

काही लहान मुलंही अशीच असतात. त्यांना काहीतरी करण्यास सांगा आणि ते पूर्ण गोष्ट जाणून न घेता सरळ त्याला नकार देतात. घरच्यांचं ऐकत नाहीत पण बाहेरच्यांचे ऐकतात. या समस्येचा *एकमेव उत्तम उपाय* म्हणजे त्यांच्याशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्याची आपली क्षमता सुधारणे. किंवा ज्या लोकांचा त्यांच्यावर प्रभाव आहे त्यांना मार्गदर्शन करण्यास सांगणे.

 

*उदाहरणार्थ* जर त्यांना अमिताभ आवडत असतील तर ते अमिताभ जे काही सांगतील ते ऐकतील, परंतु कदाचित ते शाहरूखच ऐकू शकणार नाहीत. काही लोक ज्यांना शाहरूख आवडतो ते शाहरुख जे काही बोलतात ते ऐकतील, परंतु अमिताभचे ऐकणार नाहीत. त्यांच्या आयुष्यात महत्त्व असलेल्या लोकांनी मार्गदर्शन केले की ते सहज ऐकतात अन्यथा त्यांचा विरोध आणि नकार कायम असतो. सामान्यपणे संतुलित लोक जे काही बरोबर आहे ते घेतात, मग ते शाहरूखने किंवा अमिताभने सांगितले असले तरीसुद्धा.

 

सोल्युशन अ‍ॅव्हर्जन मध्ये 3 प्रकारचे लोक आहेत – 1 शंकखोर / स्केप्टिक्स, 2- नास्तिक, 3 – लिबरल्स – हे लोक असा दावा करतात की ते 100% व्यावहारिक आणि तथ्याभिमुख लोक आहेत परंतु ते भावनेच्या आधारावर अधिक जगत असतात. त्यांना जे योग्य वाटेल त्यावरच त्यांचा विश्वास असतो. ते त्यांच्या भावनांद्वारे गोष्टींचा निष्कर्ष काढतात आणि ते त्याचा बचाव करतात.

 

सोल्युशन अ‍ॅव्हर्जन हाताळणे सोपे आहे कोणत्या व्यक्ती कडून किंवा कश्या पद्धतीच्या संवादावरून ते चटकन ऐकतात हे जाणून त्यापद्धतींने कृती करणे हे महत्वाचे ठरते.

निलेश गोरे,
हिप्नॉथेरपीस्ट आणि सायकॉलॉजीकल काउंसलर,
वेलनेस काऊंसलिंग, नवशक्ति आर्केड,
जामनेर रोड, भुसावळ.
9922851678

Protected Content