कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्या लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्यांवर कासोदा पोलिसांनी कारवाई केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन असतांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसार कासोद्यात विनाकारण फिरणार्या सुमारे १५ मोटर सायकलिंवर मोटार वाहन प्रतिबंध अधिनियम कलम २०७ प्रमाणे कासोदा पोलिसांनी कारवाई केली आहे. यात विना परवाना धारक , विना लायसन्स धारक , विनाकारण जमावबंदीत मोटरसायकल घेऊन फिरणार्या वर कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव सर यांच्या सोबत पीएसआय नरेश ठाकरे, युवराज कोळी पो.कॉ. समाधान भागवत , मुन्ना पाटील , यांच्या टीमने दि. ७ मार्च रोजी संध्याकाळी केलेल्या कार्यवाही मुळे विनाकारण गावात फिरणार्यांना चांगलाच चाप बसला आहे. कासोदा पोलीस स्टेशनच्या कार्यवाही मुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे
तर जिल्ह्यात सायबर वर पोलिसांचे लक्ष असून कोणीही व्हाट्सएप फेसबुकवर व आदी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणार्यांवर जिल्हा पोलिसांचे लक्ष आहे . कोणीही ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण होईल असे पोस्ट करू नये व खोटी माहिती पसरविणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून कोणीही आक्षेपार्ह पोस्ट शेअर करू नका असे आव्हान सपोनि रविंद्र जाधव यांनी ग्रामस्थांना केले आहे.