जळगाव प्रतिनिधी | जळगाव येथे येत्या 29 मार्च रोजी होत असलेल्या लेवा गण बोली साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी जळगाव पीपल्स को -ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे..
या संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ इतिहासकार , भाषातज्ञ व साहित्यिक डॉ.नि.रा.पाटील ( डोंबिवली ) हे असणार असून सामाजिक कार्यकर्ते , कलावंत तुषार वाघुळदे हे संयोजक आहेत तर निमंत्रक डॉ.अरविंद नारखेडे , कार्याध्यक्ष व.वा.वाचनालयाचे संचालक तथा जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात चौधरी हे आहेत. सदर संमेलन 29 मार्च , रविवारी जळगावी होणार आहे. या संमेलनात चार “शब्दकोश”कार प्रथमच एकत्र येणार आहेत. संमेलनात चर्चासत्रे , परिसंवाद , कथाकथन , नाट्यछटा , कविसंमेलन आदी कार्यक्रम होतील अशी माहिती संयोजक तुषार वाघुळदे यांनी दिली
तुषार वाघुळदे , डॉ.नारखेडे , संजय पाटील यांनी जळगाव पीपल्स को -ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन तथा सेवाभावी व्यक्तिमत्त्व, साहित्यप्रेमी भालचंद्र पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. संमेलनाच्या तयारीला सुरवात झाली आहे , अनेक अभ्यासक , कवी, लेखक या संमेलनाला हजेरी लावणार आहेत. लेवा गण साहित्य मंडळातर्फे संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.