जळगाव प्रतिनिधी । वाळू वाहतूकीवर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून दरमहा ८ हजार रूपयांचा हप्ता घेतांना चोपडा येथील मंडळाधिकारी व खासगी पंटरला रगेहात पकडले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे स्वतःच्या मालकीचे ट्रॅक्टर असुन सदर ट्रॅक्टरवर वाळू वाहतूकी दरम्यान कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दरमहा ८ हजार रूपयांची मागणी चोपडा येथील मंडळाधिकारी राजेंद्र आधार वाडे (वय-50) रा. आंबेडकर नगर, चोपडा यांनी मागणी केली. त्यानुसार पहिला हप्ता म्हणून ७ फेब्रुवारी रोजी ८ हजार रूपयांची मागणी केल्यानंतर त्याचा खासगी पंटर समाधान रमेश मराठे, वय-24, रा.पाटील गढी, चोपडा, ता.चोपडा घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. सदर कारवाई चोपडा शहरात करण्यात आली.
यांनी केली कारवाई
पोलीस उपअधिक्षक जी.एम.ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सपोउनि रविंद्र माळी, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुरेश पाटील, पोहेकॉ सुनिल पाटील, पोना मनोज जोशी, पोनासुनिल शिरसाठ, पोना जनार्दन चौधरी, पोकॉ प्रशांत ठाकुर, पोकॉ प्रविण पाटील, पोकॉ नासिर देशमुख, पोकॉ महेश सोमवंशी, पोकॉ ईश्वर धनगर यांनी परीश्रम घेतले.