पाळधी ता. धरणगाव (अलिम देशमुख) । । गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी १५ हजाराची लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवलदाराला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. जळगाव एसीबीच्या पथकाने कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त वाहन सोडण्याससह अपघाताच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला करण्यात मदत करण्यासाठी १५ हजार रुपयांची लातूरची मागणी तक्रारदार यांच्याकडे धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील पोलीस कॉन्स्टेबल सुमित पाटील यांनी केली होती. तक्रारदाराच्या चालकाकडून काही दिवसांपूर्वी अपघात होऊन एका जणांचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वाहन जप्त करण्यात आले होते. गुन्ह्यातील वाहन सोडण्यासह संशयित आरोपीला मदत करण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल सुमित पाटील यांनी 29 डिसेंबर रोजी १५ हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. त्यानुसार आज लाचेची रक्कम देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर एसीबीचे पोलीस उपअधिक्षक गोपाळ ठाकूर यांच्या पथकाने आज सापळा रचत संशयित आरोपी पोलिस कर्मचारी सुमित पाटील यांना पंधरा हजार रुपयांची रोकड घेताना रंगेहात पकडले. एसीबीच्या पथकाने आज केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.