लाचखोर कोतवालासह पंटर एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतीची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदाराकडून १२ हजाराची लाच घेतांना कोतवालासह एका खासगी पंटरला रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे महसूल पथकात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

कुर्‍हेपानाचे भागातील तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे तक्रार दिली होती. शेतीची नोंद सातबारा उतार्‍यावर घेण्यासाठी त्यांनी मंडळाधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कोतवालांना भेटण्यास सांगितल्यानंतर कोतवाल रवींद्र धांडे यांनी १२ हजारांची लाच मागितली मात्र लाच द्यावयाची नसल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. मंगळवारी १८ एप्रिल रोजी दुपारी कोतवालाने खाजगी पंटराकडे लाच देण्याचा इशारा केल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे मंडळाधिकार्‍यांच्या नावाने लाच घेण्यात आल्याने मंडळाधिकार्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी ही कारवाई केली. एसीबीच्या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

Protected Content