Home Uncategorized लष्कराच्या सेवेतून प्रविण पारीस्कर निवृत्त

लष्कराच्या सेवेतून प्रविण पारीस्कर निवृत्त

0
28

 

यावल : प्रतिनिधी  । तालुक्यातील साकळी येथील मुळ रहिवाशी व  भारतीय सैन्यात कार्यरत असलेले प्रविण लोटू पारीस्कर सैन्यदलातील १७ वर्षाची सेवा बजवून १ ऑगस्टरोजी सेवानिवृत्त होत आहेत .

 

प्रविण पारिस्कर प्रतिकुल परिस्थितीवर मात करत तसेच देशसेवेची खूणगाठ मनाशी बांधत १ ऑगस्ट २००४ रोजी बुलढाणा येथे सैन्यभरती दरम्यान सैन्यदलात भरती झाले. वर्षभर नगर येथील आर्मी ट्रेनिंग स्कूल मध्ये सैन्यदलाचे ट्रेनिंग पुर्ण केले.

 

ट्रेनिंगनंतर पारिस्कर यांना १३ आर्मी रेजिंमेन्ट पटीयाला याठिकाणी पोस्टींग मिळाली.  त्यानंतर ऑटोइन्सस्टर (नगर),

बबिना, गंगानगर,२७ राष्ट्रीय राइफल जम्मू -कश्मिर व हिसार अशा  वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सलग अठरा वर्षाची सेवा बजाविली आहे. त्यांचे १२ वी आयटीआयपर्यंचे शिक्षण झालेले आहे.

 

पारिस्कर यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी १ ऑगस्टरोजी मित्रपरिवाराकडून गावातील मुख्य चौकापासून स्वागत मिरवणूक  काढली जाणार आहे. सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाची गावात पहिल्यांदाच अशी स्वागत मिरवणूक काढली जाणार आहे

 


Protected Content

Play sound