मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | श्रध्दा वालकर या तरूणीची हत्या ‘लव्ह जिहाद’मधून झाल्याचा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला असून त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला आघाडीने घाटकोपरमध्ये आंदोलन केले आहे.
पालघर येथील श्रध्दा वालकर या तरूणीचा आफताब पुनावाला याने केलेल्या क्रूर हत्येमुळे देश हादरला आहे. या प्रकरणाचा सर्वत्र तीव्र निषेध करण्यात येत आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी आज सकाळी हे प्रकरण लव्ह जिहादमधून झाल्याचा आरोप केला होता.
यानंतर आज दुपारी घाटकोपरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. याप्रसंगी आफताबच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून जोरदार निषेध केला. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सुपुर्द करावेत. तसेच, आफताब पुनावाला याला कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी आंदोलकनर्त्यांनी केली.