लग्नाच्या पत्रिकेत चक्क गुगल पे-फोन पेचा क्यूआर कोड

 

चेन्नई : वृत्तसंस्था । कोरोनामुळे लग्नाला येऊ न शकलेले नातेवाईकांना देखील वधू-वराला अहेर पाठवता यावेत यासाठी लग्नपत्रिकेवर चक्क गुगल पे आणि फोन पेचं क्यूआर कोड छापण्यात आला.

कोरोनामुळे लग्न सोहळ्यातही मोठे बदल झाले आहेत. आता नवविवाहित जोडे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी आणि भेटवस्तू घेण्यासाठी ऑनलाईन मनी ट्रान्सफरचा आधार घेत आहेत. असाच एक अनोखा मार्ग तामिळनाडुच्या मदुरईमधील कुटुंबाने काढला आहे

 

शिवशंकरी आणि सरवनन यांचा लग्नसोहळा १७ जानेवारीला पार पडला. त्यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या या अनोख्या लग्नपत्रिकेमुळे. ही लग्नपत्रिका सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाली आहे

वधूची आई टी. जेय जयंती यांचं मदुरईमध्ये ब्युटी पार्लर चालवतात. त्यांनी मुलीच्या लग्नात ही आगळीवेगळी परंपरा सुरु केली. अनेक पाहुण्यांनी-नातेवाईकांनी याचा वापरही केला.

टी. जे. जयंती म्हणाल्या, लग्नपत्रिका व्हायरल झाल्यापासून आम्हाला खूप नातेवाईकांचे, मित्र-मैत्रीणींचे फोन आणि मॅसेजेस येत आहेत. लग्नाला येऊ न शकलेल्या तब्बल ३० हून अधिक नातेवाईकांनी क्यूआरकोडचा पर्याय निवडत वधू-वराला अहेर पाठवले आहेत. अनेकांनी या आयडियाचे कौतुक केले आहे.

Protected Content