रोहीणी खडसे यांची कोरोनावर मात; डॉक्टरांचे मानले आभार (व्हिडीओ)

जळगाव सचिन गोसावी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांचा कोरोना अहवाल कोरोनामुक्त आला आहे. आज त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आणि नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रोहिणी खडसेंना १५ नोव्हेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सारा आणि मुलगा समरजीत यांना देखील बाधा झाल्याने तिघांना शहरातील मेहरूण परिसरातील सारा मल्टिस्पेशालीटी हॉस्पीटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होत.

आठ दिवसांच्या उपचारानंतर आज तिघांना कोरोना अहवाल निगेटीव्ह आला असून तिघांना कोरोनावर मात केली. गेल्या आठवड्यात रोहिणी खडसे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे आपल्या ट्विटर अकाउंट वरून सांगितले होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला यावेळी त्यांनी भावनिक होऊन रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/867301283811091/

Protected Content