मुक्ताईनगर : प्रतिनिधी । मीटरचे रिडींग न घेता आकारले गेलेले वीजबील कमी करण्याबाबत आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आशिया युवा आंतरराष्ट्रीय मॉडेल संयुक्त राष्ट्रचे भारतीय प्रतिनिधी रोहित काळे यांनी एमएसईबीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले .
मुक्ताईनगरमधील लोकांची तक्रार आहे की विजबील विद्युत मीटरचे रिडींग नकरताच बिल आकारण्यात येत आहे. आणि बिल सुध्दा जास्त प्रमाणात आकारण्यात येत आहे या मुद्याने त्रस्त असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांनी तक्रार केली आहे . रिडींग घेणारे कंत्राटदार रिडींग घेत नसून अंदाजे रिडींग टाकत आहेत आणि बिल जास्त प्रमाणात येत आहे. रोहित काळे यांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेत त्यांच्या लक्षात आणून दिले आणि विनंती केली की बिलाची रक्कम कमी करा आणि दोषीवर कारवाई केली जावी, बर्याच लोकांवर पाच हजारांपेक्षा जास्त रकमेचा शुल्क आकारण्यात आला आहे.
रोहित काळे यांनी म्हटले आहे की कारवाई केली नाही किंवा मुक्ताईनगरातील नागरिकाला दिलासा दिला नाही तर तक्रार मुख्य सचिवांकडे करावी लागेल