शेंदूर्णी, प्रतिनिधी । मीडिया क्षेत्राशी निगडित असलेले व सामाजिक कार्यकर्ते असलेल्या पित्याने लॉक डाऊनचे सर्व नियम पळून ५० लोकांच्या उपस्थतीत आपल्या लाडक्या मुलीचा निकाह केल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
शेंदुर्णी येथिल शेख हमीद हे सामाजिक कार्यकर्ते असून स्टार 18 न्यूज चॅनलचे संपादकही आहेत. त्यामुळे मित्र परिवार व नातेवाईकांचा पण त्यांचा मोठा गोतावळा आहे. अश्या परिस्थितीत ५० लोकांच्या उपस्थितीत कन्या रोशनीचा निकाह करणे त्यांच्यासाठी जिकिरीचे होते. परंतु, सर्व नातेवाईकांना संदेश पाठवून लग्नाला हजर न राहता व्हाट्सएपच्या माध्यमातून वधू वरांना आशीर्वाद देऊन उपकृत करण्याचे आवाहन त्यांनी नातेवाईक व मित्र परिवाराला केले होते. त्यामुळे वधू रोशनी वरराजा फरहान व त्यांच्या निकटच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. त्यातून समाजासमोर त्यांनी एक आदर्श निर्माण केला. यामुळे शेख हमीद व परिवाराचे अभिनंदन केले जात आहे. स्टार 18 न्यूज चॅनलचे संपादक शेख हमीद यांच्या कन्येचा निकाह वाकोद येथिल फरहान या युवकाशी मुस्लिम समाजाचे रितिरिवाजा प्रमाणे शासनाच्या निर्देशाचे पालन करत ५० आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सोशियल डिस्टन्सच्या नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. निकाहसाठी उपस्थित नातेवाईकांना मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक करण्यात आले होते.