जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव व रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी 3030 यांच्या संयुक्तविद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील समुद्रकिनऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाप्रसंगी गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी पर्यावरणाचे महत्व उपस्थितांना सांगितले. यात त्यांनी आज प्लॅस्टिकचा भरपूर उपयोग आपण करीत आहोत आणि बरेच लोक डस्टबिनचा वापर न करता असाच उघड्यावर कचरा फेकतात त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान तर होतेच त्याबरोबर पर्यावरणाचे संतुलन सुद्धा बिघडते. आपण एक जबाबदार नागरिक बनून आपल्या पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला शुद्ध हवा, पाणी मिळेल तसेच मुक्या प्राण्यांना सुध्दा त्याचा फायदा होईल. यावेळी महाविद्यालयाच्या रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरीच्या विद्यार्थ्यांनी, आलिबाग येथील समुद्रकिनाऱ्यावरील कचरा उचलला. यात प्रामुख्याने प्लास्टिक पाणी बाटली, प्लास्टिक पिशवी, चप्पल इत्यादीचा समावेश होता.