बनावट कागदपत्रे दाखवून दीड लाखात फसवणूक करणाऱ्यास अटक

3Frauds

जळगाव प्रतिनिधी । ऑनलाईन कार विक्रीत जळगावात एकाची दिड लाखात फसवणूक करणाऱ्या ठगास भरपूर (राजस्थान) येथून अटक करण्यात आले. आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, परन सुनिल कुमार देशमुख (वय-२९) रा. विश्वगौरव अपार्टमेंट, निमखेडी रोजी जळगाव यांना अज्ञात व्यक्तीने खोटे नाव सांगून आमची बदली जैसलमेर राजस्थान येथे झाली असून त्यांची ह्युडाई २० कार विकायची असल्याचे सांगून ओएलएक्स साईटवर फोटो टाकून गाडीचे बनावट कागदपत्र टाकले. यात सुनिल देशमुख यांच्याकडून बनावट पॅनकार्ड, आधारकार्ड, कॅन्टीन कार्ड दाखवून १ लाख ४६ हजार रूपये घेवून फसवणूक केल्याची घटना ५ जानेवारी ते १६ जानेवारी २०१९ दरम्यान घडली होती. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल वर्षभरानंतर राजस्थान राज्यातील भरतपूर येथील संशयित आरोपी लवदिप लखमीचंद (वय-२९) रा. खुर्द भंडोर, जिल्हा भरतपूर, (राजस्थान) याला अटक केली. याकामी तपासाधिकारी पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, पोउनि अंगत नेमाने, पोना दिलीप चिंचोले, पोकॉ श्रीकांत चव्हाण, पोका गौरव पाटील, पोकॉ पंकज पाटील यांनी परीश्रम घेतले. संशयित आरोपीला आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला १० फेब्रुवारी २०२० पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

Protected Content